Ad will apear here
Next
सूक्ष्मातील भव्यता दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन
झेन वर्तन यांच्या चित्रकृती

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत चित्रकार झेन वर्तन यांच्या सूक्ष्मातून भव्यतेचा शोध घेणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्यांनी ‘सूक्ष्मातून भव्यतेचा-भव्यतेतून सूक्ष्माचा शोध’ या संकल्पनेवर आधारीत चित्रांमध्ये अंतर्मुख ध्यानाचा प्रवाह चित्रित केला आहे. 

अॅक्रेलिक व मिश्र- माध्यमे व कॅनव्हास यातून प्रचलित शैलींचा ते अनोखा परिणाम साधतात. करडे, तपकिरी असे भूमीच्या जवळचे रंग, त्यात कधी आश्चर्याचा अनुभव देणारे निळे, लाल रंगाचे अस्तित्व या सर्वांचा पोत व मिलाफ नजर खिळवून ठेवतो. प्रदर्शनात एक फूट बाय एक फूट आकारापासून नऊ फूट बाय नऊ फूट आकाराची चित्रे आहेत.

बडोदा विद्यापीठातून एम. ए. ची पदवी प्राप्त केलेल्या झेन वर्तन यांच्या वाचनात ओशोंचे ‘शून्य का दर्शन’ हे पुस्तक आले आणि त्यातून ध्यानाची प्रेरणा घेऊन, ते पुण्यास आले. पुढे झेन तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. गेली दोन दशके ते पुण्यात कार्यरत असून, अमूर्त शैलीतील चित्रे काढतात. जगभर त्यांच्या चित्रांची प्रदर्शने होत असतात. जगभर त्यांचे चाहते असून, अनेक कार्यालये, घरांच्या भिंती त्यांच्या चित्रांनी जिवंत झाल्या आहेत. 

कार्यक्रमाविषयी 
झेन वर्तन यांच्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन
स्थळ : मोनालिसा कलाग्राम, कोरेगाव पार्क, पुणे
दिवस : शनिवार, दि. आठ ते १३ डिसेंबर २०१८ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZVIBV
Similar Posts
पेशवाईचा काळ अनुभवा चित्रांमधून... पुणे : पुणेकरांच्या अभिमानाचा आणि पुण्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे ‘पेशवाई’. वैशाली राजापूरकर यांनी ‘पेशवाई’ या संकल्पनेवर आधारित काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन ११ एप्रिलपासून सुरू झाले आहे. कलाप्रेमींना हे प्रदर्शन औंध येथील वेस्टएंड सेंटरमधील ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या कलादालनात पाहता येईल
पाच वर्षांच्या अवनीची चित्रकला करतेय थक्क! पुणे : निळ्याशार समुद्रातील रंगीबेरंगी मासे... अवतीभोवती सुंदर झाडे असलेले ट्री हाऊस... रंगीबेरंगी पक्षी... फुलपाखराच्या आकारातील कोलाज... हातांच्या ठशांनी साकारलेले सुंदर चित्र... अशा विविध प्रकारच्या चित्रांच्या माध्यमातून अवघ्या पाच वर्षांच्या अवनीने आपले अनुभवविश्व कॅनव्हासवर साकारले आहे. या चिमुरडीची
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे खरे यांचे चित्र प्रदर्शन पुणे : ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’तर्फे आर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत चित्रकार विद्याधर खरे यांनी काढलेल्या क्रिएटिव्ह लाइफ साइझ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या दालनातील आर्ट गॅलरीत येत्या २३ जूनपर्यंत हे चित्रप्रदर्शन सुरू राहणार आहे.
४५ प्रसिद्ध चित्रकारांचे पुण्यात एकत्र प्रदर्शन पुणे : सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्यनगरीतील निवडक ४५ चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत. ‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’ हे चित्र प्रदर्शन शनिवार, आठ जून ते सोमवार, दहा जूनपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language